Published On : Thu, Jun 7th, 2018

रजनीचा ‘काला’ हाऊसफुल्ल

मुंबई: थलायवा रजनीकांत यांचा वादग्रस्त आणि बहुप्रतीक्षित सिनेमा ‘काला’ बुधवारी (6 जूनला) नाट्यमय घडामोडींनंतर झळकला. या सिनेमावरुन निर्माण झालेल्या वादानंतरही प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

6 जूनला दुपारी 4 वाजता सिनेमाचा पहिला शो होता. सिनेमा रिलीज होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते.केरळमध्ये तर ‘काला’ पहाण्यासाठी एका आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टी घोषित केली!

स्थगितीस नकार

के. एस. राजशेखरन यांनी काला सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यानं ‘काला’ सिनेमातील गाणी आणि काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. मात्र, सुप्रीम कोर्टानं स्थगिती देण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान कोर्ट म्हणाले की, तुम्ही सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करत आहात, मात्र सिनेरसिक सिनेमा पाहण्यास आतुर आहेत.