रामटेक : रविकांत रागीत प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख डी.एड आणि बीएड महाविद्यालय, रामटेक यांनी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी काही मदत संकलन करण्यासाठी रॅली आयोजित केली.
महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य श्री. रविकांत रागिट आणि प्राचार्या मा.प्रा.जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 22 ऑगस्ट 2019 रोजी कॉलेज, . रामटेक बस्टॉपपासून रामटेकमध्ये विविध भागात सर्वत्र रॅली आयोजित करण्यात आली होती.
रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना संबोधित केले. लोकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आथिर्क सहकार्य केले. श्री. गिरडे सर, श्रीमती नाईक मॅम, सरपाते सर, हटवार सर, मिरासे सर, नेवारे सर, शेंद्रे मॅम, उइके मॅम, वानखेडे मॅम, डॉली मॅम आणि सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.