Published On : Tue, Jun 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

कामठीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; वृद्धांसह १३ जणांना चावा, दोघांची प्रकृती गंभीर

Advertisement

कामठी : नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह १३ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाचा हा कुत्रा शहरातील विविध भागांत फिरत होता. यावेळी त्याने अचानक नागरिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात काहींना हातावर, तर काहींना पायावर व शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेनंतर जखमींना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे शहरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे पदाधिकारी दिलीप बाडेबुचे आणि नगरसेविका मनीषा नागपुरे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल आणि मुख्याधिकारी विनोद जाधव यांना माहिती देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.

Advertisement

नगर परिषदेचे पथक आणि स्थानिक युवकांनी संयुक्तपणे कुत्र्याचा शोध सुरू केला. अखेर मोंढा- कामठी परिसरात रात्री उशिरा मोठ्या प्रयत्नांनंतर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असून आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहरातील भटक्या आणि संशयित कुत्र्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन नगर परिषदेकडून देण्यात आले आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges