Published On : Sun, Apr 19th, 2020

कन्हान रूग्णाच्या संर्पकातील १० नागरीक नागपुरला क्वाइंटाईन केले

Advertisement

कन्हान : – येथील कोरोणाचा एक रूग्ण पॉझीटिव्ह अाढळल्याने त्याच्या संर्पकात आलेले पत्नी व मुलासह घरातील आठ किरायदार असे दहा सदस्यांना शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता नेऊन आमदार निवास नागपुर येथे क्वाइं टाईन करण्यात आले आहे.

दिल्लीतुन रेल्वे मध्ये प्रवास करतांना पाॅझिटिव्ह रूग्ण दगावल्याने टॅवल्स हिस्ट्री अंतर्गत कन्हान येथील तीन व्यक्ती ची तपासनी केली असता. यातील एक रूग्ण पहील्या तपासणीत निगेटिव्ह व दुसर्‍या तपासणीत पाॅझिटिव्ह आढळ ल्याने त्याच्या राहत्या घरातील पत्नी, मुला सह दोन किरायदारा पैकी एका परिवारातील पाच सदस्य असे कन्हान येथुन सात सदस्य तपासणी करिता नागपुर ला पाठविण्यात आले. तसेच दुसरे किरायादाराचे दोन मोठे व एक लहान मुलगा असे तीन सदस्य चार दिवसा अगोदर कन्हान वरून देवलापार च्या सामोर आपल्या मुळ गावी छुवारी येथे असल्याने रामटेक उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे यांच्या आदे शाने नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांनी आरोग्य विभागा व्दारे नागपुरला पाठविण्यात आले.

शासकिय रूग्णालय नागपुर येथे तपासणी करून आमदार निवास नागपुर येथे १० सदस्य नागरिकां ना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लोहिया लेआऊट रामनगर कन्हान येथी ल कोरोना रूग्णाच्या घरा सभोवताल तीनसे मिटर परिसर प्रतिबंधित करून दिवसातुन चार वेळा सॅनिटाईझरेशन करण्यात येत आहे. तेथील नागरिकांना आवश्यक गरजेच्या वस्तु नगरपरिषदेच्या किट घातलेले चार कर्मचारी पुरवठा करित आहे. उपविभागीय अधिकारी मा जोगेंद्र कटियारे, तहसीलदार वरूणकुमा र सहारे, तालुका वैधकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, डॉ योगेश चौधरी व नगरपरि षद मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार स्वत: उपस्थित राहुन परिस्थिती नियत्रिंत करि त आहे.


शुक्रवार (दि.१७) ला पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला व जिल्हा अधिकारी रवींद्र ठाकरे यानी घटनास्थ ळी भेट देऊन संबधित अधिका-यांना महत्वाच्या सुचना व मार्गदर्शन केले.

कोरोना विषाणुवर मात करण्याकरि ता कन्हानच्या नागरिकांनी घराच्या आत व सुरक्षित राहुन सहकार्य करावे, अती आवश्‍यक गरज व अडचण भासल्यास नगर परिषद प्रशासनास मोबाईलवर संपर्क करावा. शासनाच्या नियम व सुच नाचे पालन काटेकोर पणे केल्यास कोरोना ला हद्दपार करू शकतो. अशी विनंती मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यानी केली.

कन्हान चा नागरिक कोरोना रूग्ण आढळल्याने शहरातील बहुतेक नगराती ल रस्ते नागरिकांनी स्वयंफुर्त बंद करून लॉकडाऊन यशस्वि करण्याकरिता सहकार्य करित आहे.