Published On : Sun, Apr 19th, 2020

सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या कामगारांवर उपासमारीची वेळ

Advertisement

रामटेक– सूर्यलक्ष्मी कॉटन मिल नगरधन येथे अनेक बाहेर राज्यातील उडीसा, बिहार, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कामगार येथे अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत. येथील कामगारांना लॉकडाउनच्या काळातील पगार दिला नाही. त्यामुळे या 1500 कामगार व त्यांच्या कुटूंबीयांवर या आणिबाणीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कामगारांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

शासनाच्या निर्देशाचे उल्लंघन या कंपनीद्वारा केले जात आहे. शासनाने परिपत्र काढुन सर्व कंपन्याना आदेश दिले आहेत की, लॉकडाऊनच्या कालावधित सर्व कामगारांना पगार देण्यात यावे, त्यामुळे या कामगारांना कुठल्याही शासनाच्या योजनांचा लाभ या कामगारांना भेटत नाही. त्यांना रेशनपासूनसुद्धा वंचित ठेवल्या गेले. त्यामुळे या कामगारावर व त्यांच्या कुटुंबीयांवर लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह करणे खूप कठीण झाले आहे. कामगार शिष्टमंडळात राजेश मलिये, प्रदीप बावणे, रेवनाथ मदनकर, योगेश गडे, जगदीश पटले आदींचा समावेश आहे.

सुर्यलक्ष्मी कॉटन मिल नगरधन चे जनरल मॅनेजर सुनील जोशी यांचेशीं विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सर्व कामगारांचे पगार झाले आहेत. जवळपास 80% पगार सर्व कामगारांचे झाले आहेत. मार्च महिन्याच्या 13 तारखेला सर्व कामगारांचे पगार त्यांच्या अकाउंट मधे जमा झाले आहेत. इकोनॉमीकल फणडींग ची पोझिशन बरोबर नाही आहे, मॅनेजमेंट जवळ पैसा नाही आहे म्हणून 20% पगार त्यांना आहे तो लॉक डाऊन संपल्यानंतर त्यांना मिळेल. सरकार कडून जे ही सुविधा आहेत ते त्यांना मिळत आहेत. सर्व कामगारांचे पगार झाले असून अफवा पसरवली जात असल्याचे देखील त्यानी सांगितले.