कन्हान : महामार्ग क्र.४४ ( जुना क्र.७ ) वरील ऑटोमोटिव्ह चौक ते टेकाडी फाट्यापर्यंत सिमेंट मार्गाचे १८ किलो मीटर लांबीचे निर्माणकार्य सुरू आहे. जवळपास २५३ कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या मार्गाला निर्माणधिनच्या काळातच जागोजागी तडे गेले असल्या मुळे या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेने आतापर्यंत दोन निष्पाप लोकांचे जीव गेला आहे.
केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांचा डिमप्रोजेक्ट असलेल्या आॅटोमोटिव्ह चौक नागपूर ते टेकाडी फाट्यापर्यंत चारपदरी सिमेंट रोडचे काम सुरू आहे. या कामाचे कंत्राट केसीसी बिल्डकाॅन कंपनीला दिले आहे. २५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या कामादरम्यान केसीसी कुठलेही मापदंड पाळत नसल्यामुळे या कामा वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगाने सुरू असलेल्या या कामादरम्यान नवनिर्माण रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नाही. त्यामुळे सिमेंट रोडचे मजबुतीकरण होत नसल्याने या रोडला निर्माणधिनच्या काळातच मोठमोठे तडे गेले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हाच प्रकार रस्त्याच्या कडेला बांधण्यात येत असलेल्या नाल्यांच्या बाबतीत असून या नाल्या किती काळ टिकेल हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही एवढे ठिसाळ काम केसीसी तर्फे सुरू आहे.
चारपदरी सिमेंट रस्ता बनविण्या च्या कामाला अति वेगानी करण्याचे कार्य सुरू आहे. वेगात करण्या मागे कारणे काही असो परंतु निर्माण कार्यात जरास्या निष्काळजी मुळे येणाऱ्या एकाच वर्षात हा महामार्ग पुन्हा दुरुस्ती करावे लागेल का असे प्रश्न व वाचा नागरिक करीत असुन या सिमेंट रस्त्याचे मुल्याकंन व्यवस्थित करण्यात यावे अशी मागणी प्रवासी , नागरिक करीत आहे .
सुरक्षा मानके नरारद
केसीसी तर्फे सुरू असलेल्या या कामादरम्यान कुठलीही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत नाही. रस्त्याच्या मधात १० फिट खोलगट भाग व रस्त्याला जोडून बनविण्यात येत असलेल्या सव्र्हिस रोडच्या मध्ये दोन ते अडीच फूटाची नाली बनविली आहे. मात्र या नालीला अद्यापही गिट्टी टाकून समतल केले नसल्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनचालकाचा अंदाज चुकलाच तर थेट तो गाडीसह नालीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नालीत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून वाहनचालक व प्रवासाना अपघातास बळी पडत आहे .
सिमेंट मार्गा ला मजबुती करीता सर्वात जास्त गरज पाण्याची असते परंतु वेगाने काम करण्या मागे व जास्त नफा या कामात मिडावा या अनुशंगाने देखील मार्गावर पाण्याचे प्रमाण दुर्लभ झाल्याचे दिसून येत आहे ज्या मुळे आता मार्गा वरील बरेच जागी छोट्या मोट्या क्रॅक पडू लागलीत तर पाणी अभावी सिमेंट चौपदरी महामार्गाची कोपऱ्यातील भाग जड वाहनांच्या किती पट वजे उचलू सकेल याला देखील प्रश्न कारण काही जागी तुटलेले कोपऱ्यातील रोड बघून याच्या मजबुती वर ही नागरिक बोलू लागले आहे.
सिमेंट रस्ता निर्माण कामात मोठय़ा प्रमाणात सिमेंट, राख, मातीचा उपयोग होत असुन पाण्याचा व्यवस्थित निचरा व पाणी नियमित मारत नसल्याने धुळीचे प्रदुषण मोठय़ा प्रमाणात होऊन ये-जा करण्या-या तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुला १ते १/२(दीड) कि. मी. परिसरातील नागरिकांच्या शरीरात धुळीचे कण जात असल्याने संसर्गजन्य आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रदुषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेले दुर्लक्ष संशोधनाचा विषय आहे.
