नागपूर: एका जनहित याचिकेप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांवर ‘१’ रुपया वैयक्तिक दंड ठोठावला आहे. दरम्यान कन्हान रोड व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ७ (एनएच. ७) यांच्या रुंदीकरणासंबंधी एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याने एनएचएआयचे वकील अॅड. कठाने यांना न्यायालयाने चांगलेच खडसावले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ७ आणि कन्हान रोड यांच्या संदर्भात चंद्रभानसिंग राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. उपाध्ये यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. भांडारकर यांनी तर जिल्हाधिकारी यांच्यातर्फे अॅड. मेहरोज पठाण यांनी युक्तिवाद केला.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालकाला ‘वैयक्तिक दंड’ म्हणून न्यायालयाने नाममात्र ‘१’ रुपया दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे न्यायालयीन वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे.
—Swapnil Bhogekar
