Published On : Mon, Sep 20th, 2021

प्रा. डाॅ. भाऊ लोखंडेंचा प्रथम स्मृतीदिन उद्या

Advertisement

– लश्करीबाग येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन

नगपूर. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक, अमोघ वाणिचा वक्ता, राजकारणपटू, प्रज्ञावंत साहित्यिक, संशोधक, निधड्या छातिचा हजतजबाबी विचारवंत व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक प्रा. डाॅ. भाऊ लोखंडे यांचे गत 22 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना काळात निधन झाले होते.

बुधवार 22 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता प्रा. डाॅ. भाऊ लोखंडे यांचा प्रथम स्मृतीदिन असून त्यानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह लष्करीबाग येथे श्रध्दांजलि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत व साहित्यीक प्रा. रणजित मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यीक डाॅ. ताराचन्द्र खांडेकर, डाॅ. धनराज डहाट, डाॅ. प्रज्ञा बागडे आणि अश्वधोष भाऊ लोखंडे यांची उपस्थिती राहणार.

उपरोक्त सभेला षहरासह विदर्भातील आंबेडकरी चळवळीषी जुळलेल्या मान्यवरांची उपस्थिती राहणार, अषी माहिती प्रसिध्दी पत्रकातून आयोजक बाळु घरडे, ई. मो. नारनवरे, नरेश वाहाणे यांनी दिली.