Published On : Mon, Sep 20th, 2021

पॅनल अधिवक्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

भंडारा:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार 19 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा येथे पॅनल अधिवक्त्यांकरिता भौतिक व आभासी पध्दतीने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन भंडारा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

न्यायाधीश व अधिवक्ता हे कायद्याचे संरक्षणकर्ता आहेत. सर्व पॅनल अधिवक्त्यांनी मानधनाकडे लक्ष न देता सेवाभावी उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणामार्फत नियुक्त प्रकरणे चालवावे. सर्व पॅनल अधिवक्त्यांनी वकिली क्षेत्रात निष्णांत होण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा तसेच न्यायालयात पुरावा सादर करतांना कोणत्या बाबींकडे भर द्यायला पाहीजे याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खूणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Advertisement

न्यायालयात चालणारी फौजदारी खटल्यांची प्रक्रिया, फौजदारी खटला चालवितांना अधिवक्त्यांनी काय करावे व काय करु नये तसेच भारतीय दंड सहितेतील महत्वाच्या तरतूदीबाबत बीड जिल्हा अधिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲड. मंगेश पोकळे यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅनल अधिवक्ता श्रीमती सोनाली अवचट यांनी केले तर उपस्थितांचे आभार सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे यांनी मानले. सदर कार्यक्रमास आभासी पध्दतीने भंडारा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, भंडारा जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर. के. सक्सेना व इतर सदस्य तसेच विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अधिवक्ता उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement