Advertisement
कन्हान : – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च २०१९ च्या परिक्षेत पुष्कर राजेंद्र मेश्राम हयानी ९६.२०% गुणाने उर्तीण होऊन कन्हान चे नावलौकिक केले.
पटेल नगर कन्हान येथील रहिवासी राजेंद्र मेश्राम यांचे चिरंजीव पुष्कर राजेंद्र मेश्राम हयानी ऑनलाइन जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च २०१९ च्या १० वी परिक्षेत सोमलवार हायस्कूल निकालस खामला शाळेतुन ९६.२०% अंक प्राप्त करून सोमलवार निकालस ब्रँच मधुन बारावा मेरीट आणि चाटे कोचिंग क्लासेस च्या नागपुरातील सर्व ब्रँच मधुन पहिला क्रमांकाने उर्तीण होऊन कन्हान शहराचे नावलौकिक केल्याने कन्हान शहर व परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.