Published On : Fri, May 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश वस्तू प्रकरणाचा धागा नागपूरपर्यंत; ATS ने संशयिताला घेतले ताब्यात!

Advertisement

नागपूर : पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण रुग्णालयात सापडलेल्या बॉम्बसदृश वस्तू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शालिमार एक्स्प्रेसने नागपूरकडे येत असताना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव शिवाजी राठोड असून तो पुण्यातील मांजरी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ATS आणि नागपूर ATSच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत त्याला पकडले. कारवाईनंतर संशयिताला पुढील चौकशीसाठी नागपूरला आणण्यात आले.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही दिवसांपूर्वी पुण्यातील उषा किरण रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात कमी तीव्रतेच्या स्फोटकांनी बनवलेली संशयास्पद वस्तू आढळून आली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी पोहोचून ती वस्तू सुरक्षितपणे निकामी केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तपासादरम्यान ATSला संशयिताच्या दुकानातून रिकामा टायमर बॉक्स मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हा बॉक्स IED तयार करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा सध्या सखोल तपास सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, पुणे पोलीस, गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र ATS संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत असून स्फोटकांचा स्रोत आणि संभाव्य कटाचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ #Crime #NagpurCrime #HouseTheft #News

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges