Published On : Thu, May 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

POK मध्ये पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा; भारताचा मोठा शत्रू हमजा बुरहान ठार

Advertisement

नवी दिल्ली : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून (POK) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कथित मास्टरमाइंड आणि ‘अल बदर’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हमजा बुरहान याची मुजफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात तो जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

हमजा बुरहान हा पाकिस्तानमध्ये बसून भारताविरोधात दहशतवादी कारवायांचे नियोजन करत असल्याचा आरोप होता. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यामागे त्याचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले जात होते. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते आणि संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने मोठी लष्करी कारवाई करत बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले चढवत अनेक तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता.

दरम्यान, हमजा बुरहानच्या हत्येनंतर POK मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुजफ्फराबाद परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे. हल्लेखोर कोण होते आणि या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, हमजा बुरहान हा भारतातील अनेक दहशतवादी कटांमध्ये सक्रिय होता. त्याच्या मृत्यूनंतर दहशतवादी संघटनांना मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges