Published On : Sat, Aug 24th, 2019

प्लसनिडचा शुभारंभ नितीन गडकरींच्या हस्ते

Advertisement

रोज नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध

नागपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘www.plusneed.com’ वेबसाईटचा शुभारंभ केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी रामनगर येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी प्लसनिड सोल्युशन चे संस्थापक प्रमोद निखार, आमदार विकास कुंभारे, श्रेयश कुंभारे, आमदार कृष्णाजी खोपडे, सुधाकर निखार, सुनील निखार, डॉ. हेमाक्षी निखार, अनिल निखर, गणेश कुंभारघरे आणि प्लसनिडची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी लहान लहान उद्योगांना, एकाच प्लॅटफॉर्म वर आणण्याच्या उद्देशाने प्रमोद निखार यांनी प्लसनिड वेबसाईटची निर्मिती केली. आपल्या ग्लोबल अनुभवांचे मार्गदर्शन विदर्भातील युवकांना देण्याचा मानस त्यांनी बाळगून 2018 साली नागपुरात प्लसनिड सोल्युशन प्रा. ली. नावाची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू करून ते स्वस्थ बसले नाही तर त्यांनी विदर्भातील 100 पेक्षा जास्त तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

या वेबसाईटच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कोणतेही कमिशन न भरता, प्लसनिडद्वारे रिअल टाइम व्यवसायाची लीड मिळेल. कुशल व्यक्ती आणि कारागीर यांना प्लसनिड वर रोज नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

ब्युटी पार्लर, ट्यूटर्स, केटरर्स, प्लंबर प्लस इत्यादि व्यवसाय प्लसनिडच्या माध्यमातून डिजिटल करता येईल. यामुळे ग्रामीण भागातील उद्योगांना चालना मिळेल आणि बेरोजगारासाठी रोजगार मिळवून देण्यास मदत होईल. याचबरोबर महाराष्ट्रातील स्थानिक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आणि ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध होतील अशी माहिती कंपनीचे संस्थापक प्रमोद निखार यांनी दिली.

Advertisement
Advertisement