Published On : Sat, Aug 24th, 2019

दादासाहेब बालपांडे काॅलेज आॅफ फाॅर्मसी, चे बेसा-बेलतरोडी ग्रामपंचायत मध्ये भारत स्वच्छता अभियान व आरोग्यसंबंधी जागरूकता मोहिम….

नागपूर : दादासाहेब बालपांडे काॅलेज आॅफ फार्मसी, बेसा, नागपूर, व बेसा-बेलतरोडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोज शनिवार दि. २४ ऑगष्ट रोजी, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या N.S.S. अंतर्गत भारत स्वच्छता अभियान व आरोग्या संबंधी जागरूकता कार्यक्रम बेसा-बेलतरोडी गावाच्या परिसरामध्ये नुकताच आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

तसेच भारत स्वच्छता अभियाना सोबतच विद्यार्थ्यांनी बेसा-बेलतरोडी परिसरातील नागरिकांना स्वच्छता मोहीम संबंधी व आरोग्य विषयक जागरूकतेचे परिपत्रकाचे वितरण व मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील पदवी व पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी महाविद्यालयाच्या परिसरात ‘‘वन महोत्सव-2019’’ या कार्यक्रमाचे आयोजन केले व सदर कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील हर्बल गार्डन मध्ये विविध प्रकारची औषधीयुक्त झाडांचे वृक्षारोपण केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. मनोज व्ही. बालपांडे , बेसा-बेलतरोडी ग्रामपंचायत चे मा. सरपंच सुरेन्द्रजी बानाईत व बेसा-बेलतरोडी ग्रामपंचायतचे इतर पदाधिकारी मुकेश काळे, सुनीलजी सोनटक्के, लता इंगळे, नंदा इंगळे, सिमा त्रिमगरवार, शालिनी कंगाली, सीमा गडपांडे, संजय भोयर, जीतु चांदुरकर, कल्याणी जयपुरकर तसेच पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. उज्वला महाजन व पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नितीन दूमोरे, समाजसेवक गिरीषजी गदगे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्या डाॅ. सौ. उज्वला महाजन व पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन दुमोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.