| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 28th, 2020

  पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेचे पदग्रहण

  नागपूर: जनसंपर्क क्षेत्रातील अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्था ‘पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया’च्या नागपूर शाखेचे पदग्रहण समारंभ गुरुवार, 27 फेब्रुवारीला धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात पार पडला.

  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वेकोलीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या गवर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बी.एन. कुमार, वायसीसी के अखिल भारतीय सचिव अविनाश गवई, वेकोलीचे क्षेत्रीय व्यवस्थापक डी.एम. गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार आणि राजेश बोबडे उपस्थित होते.

  या प्रसंगी बोलताना राजीव मिश्रा म्हणाले की, जनसंपर्क हे अत्यंत व्यापक क्षेत्र आहे. तुम्ही समाजाचे डोळे होणार आहात; त्यावेळी योग्य विचार करून आपले कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. बी.एन. कुमार यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवादही साधला आणि त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरेही दिली. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरीत करताना ते ते म्हणाले की, जनसंपर्क क्षेत्रात करिअरच्या अनंत संधी असून पीआरसीआय तुमच्याशी जुळून योग्य मार्गदर्शन करण्यास कटीबद्ध असेल. अविनाश गवई यांनी यंग कम्युनिकेटर क्लबची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, वायसीसी हा इंडस्ट्री आणि अकादमी या दोघांमधील एक दुवा याद्वारे जनसंपर्क क्षेत्रात चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

  तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पंबाजराव देशमुख आणि विमलताई देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन नाखले यांनी केले. आभार पीआयबीचे सहाय्यक संचालक साशिन राय यांनी केले. कार्यक्रमाला धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख नितीन कराळे, सर्व विद्यार्थी आणि मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती.

  कार्यकारिणी :
  बबन नाखले (मार्गदर्शक), आशिष तायल (अध्यक्ष), अभिषेक मोहगावकर (सचिव), कुंदन हाते (सहसचिव), निखिलेश सावरकर (कोषाध्यक्ष), अमर अणे (वायसीसी समन्वयक), साशिन राय (प्रसिद्धी समन्वयक), विजय राजपूत (सदस्य समन्वयक)

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145