नागपूर: हिंगणघाटच्या दूर्देवी घटनेनंतर मुंबई येथे अश्याच एका ‘बेटीची छेड काढणा-याला जामीन मिळाला,जामिनातून सूटून येताच त्या नराधमाने त्या मुलीलाच पेटवून टाकले आणि कायमचे संपवले. राज्याच्या राजधानीत सरकारच्या नाकाखाली अशी घटना घडते,बेटीयो को डिजल डालकर जला दिया जाता है,इस सरकारके मां बहनो बेटीयो काे भी सडक पर लाकर जला देना चाहीये!असे वादग्रस्त विधान भाजपच्या दक्षिण-पश्चिम मंडळाच्या अध्यक्षा अनुसुया गुप्ता यांनी केले.
छत्रपती चौकात भाजपतर्फे सरकारविरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले होते. नागपूरच्या सहाही विधान सभा क्षेत्रात हे आंदोलन करण्यात आले . दक्षिण-पश्चिम विधान सभा क्षेत्रातील आंदोलन छत्रपती चौकात करण्यात आले असता पहील्याच वक्त्या म्हणून गुप्ता यांनी ध्वनिक्षेपक हातात घेतला आणि..बोलण्याचा संतापात त्यांचा तोल सुटला.विशेष म्हणजे याप्रसंगी महापौर संदीप जोशी,माजी महापौर नंदा जिचकार यांचे आगमन कार्यक्रम स्थळी व्हायचे हाते मंचावर भाजप युवा मोर्च्याच्या अध्यक्षा शिवाणी दाणी,लक्ष्मी नगर झोन सभापती प्रकाश भोयर हे प्रामुख्याने उपस्थित हाेते.
गुप्ता यांच्या वक्तव्याने दाणी आणि भोयर यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. संतापाच्या भरात गुप्ता यांचा तोल सुटला.सरकारला दूषणे देतानाच त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावर भाजपच्या आंदोलकांचीही बोलती बंद झाली. मंचासमोर बसलेले आंदोलक नगरसेविका,नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. गुप्ता यांनाही लगेच आपल्या चुकीच्या, भडकावू शब्दांची जाणीव झाली आणि लगेच त्यांनी सारवा सावर करण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
‘सरकार के मा बहनो,बेटियो को सडक पर लाकर जला दे’ हे त्यांचे विधान कदापि समर्थनार्थ नव्हते अशी चर्चा देखील आंदोलन स्थळी ऐकू आली. एकीकडे मंचा वरून भाजपची नेते मंडळी ‘ नारी के सन्मान में…भाजपा मैदान में’ अश्या घोषणा देत असताना त्यांच्याच पक्षाची जवाबदार कार्यकर्त्या ने,सरकारच्या कुटुंबातील महिलांसाठी अश्या उग्र,संस्कारविहिन भावना मंचा वरून उघडपणे व्यक्त केल्या,याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.
ही सरकार महाआघाडी नसून बिघडी हुई सरकार असल्याचे त्या म्हणाल्या. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांनी पराकाष्ठा गाठली असल्याचा त्या म्हणाल्या.हिंगणघाट प्रकरणातील आरोपी पोलिसांनी माझ्या सुपूर्द करावे ,त्याचे मी काय हाल करील याची तुम्ही कल्पना ही करू शकणार नाही. महिलांमध्ये खूप ताकत आहे,ती दुसऱ्या घरातून येऊन एका अनोळखी घराला,कुटुंबियांना स्वीकारते, ते घर सांभाळून दाखवते, महिलांना कोणी कमजोर समजू नये,असे सांगून ‘ बेटी बचाओ’ साठी आम्ही मुंबई पर्यंत मोर्चा घेऊन जाऊ.
विधान चुकीचे पण भावना खरी- अनुसुया गुप्ता
आंदोलना नंतर खास ‘ सत्ताधीश’ ने गुप्ता यांना या वादग्रस्त विधाना विषयी फोनवर विचारले असता, बोलण्याचा ओघात वादग्रस्त शब्द निघून गेले असल्याची कबुली त्यांनी दिली. ज्यांची ‘ बेटी’ गेली त्यांचे दुखं मनात दाटून आले,संताप अनावर झाला त्यामुळे चुकीचे विधान तोंडातून निघून गेले,अशी सारवा सारव त्यांनी केली. मी स्वतः महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सदस्या आहे,मुंबईत मी आपल्या कारकिर्दीत २३-२४ वेळा जाऊन आले,इतर सदस्या या फक्त ५-६ वेळा गेल्या यावरून महिलांप्रती माझं काम दिसतं, असं कारण सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

