Published On : Tue, Aug 18th, 2020

कामठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप यशस्वी

कामठी :कामठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन १०० टक्के कोषागार कार्यालयातून व्हावे, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता तत्काळ रोखीने देण्यात यावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, सफाई कामगारांना पदोन्नती व वरिष्ठ श्रेणी लागू करावी, आरोग्य निरीक्षण संवर्ग समावेश त्वरीत करण्यात यावे, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आज सोमवारी नगर परिषदेचे सर्वच कर्मचारयांनी एक दिवसाचा संप पुकारला होता या एक दिवसीय संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या संपात मोठ्या संख्येत कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शविल्याने पूर्ण एक दिवस काम बंद झाल्याने आजचे कामे खोळंबले.

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना तसेच संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय जैस्वाल, उपाध्यक्ष मसूद अखतर, सचिव प्रदीप भोकरे, सहसचिव नरेश कलसे, विजय मेथीयां, धर्मेंद्र जैस्वाल, पुंडलिक राऊत,रुपेश जैस्वाल, रंजित माटे,माधुरी घोडेस्वार, अश्विनी पिल्लारे आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी