Published On : Wed, Oct 24th, 2018

गोवर रूबेला लसीकरण मोहीमेची पालकसभा घेऊन जनजागृती

Advertisement

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान अंतर्गत जि प प्राथमिक शाळा सिहोरा व नेहा प्राथमिक शाळा वाघधरेवाडी येथे पालकसभा घेऊन गोवर रूबेला लसीकरण मोहीमेची जनजागृती करण्यात आली .

पोलिओचे आपल्या देशातुन उच्चाटन केल्या नंतर आता गोवर रूबेला या रोगाला हद्दपार करण्याकरिता संपुर्ण महाराष्ट्रात ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांन करिता गोवर रूबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ पासुन राबविण्यात येणार आहे .

या अनुसंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जि प प्राथमिक शाळा सिहोरा व नेहा प्राथमिक शाळा वाघधरेवाडी येथे विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेऊन डॉ योगेश चौधरी वैद्यकीय अधिकारी कन्हान, श्री संतोष पारधी आरोग्य सहाय्यक, सुरेंद्र गि-हे आरोग्य सेवक हयानी मार्गदर्शन केले . गोवर रूबेला या रोगाचे समुळ उच्चाटन करण्याकरिता ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांचे १००% लसीकरणा होणे गरजेचे असल्याने विद्यार्थी , पालक व शिक्षकांचे सहकार्य मोलाचे आहे .

या लसीकरणामुळे रोगराई पासुन बचाव करण्यात येईल. करिता जनजागृती करून ही मोहीम राबवण्यात सर्वानी सर्वोपरी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ योगेश चौधरी हयानी केले आहे . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नेहा प्राथमिक शाळेच्या सौ तांदुळकर, पाहुणे मँडम, श्री खोब्रागडे सर, जि प प्राथमिक शाळा सिहोराचे मुख्याध्यापक श्री बांभुळकर व सर्व काही शिक्षक, आरोग्य सेविका शारदा वासनिक, सारिका धारगावे , आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका व परिसरातील पालकांनी मौलाचे सहकार्य केले .