Published On : Wed, Aug 25th, 2021

नागपूरच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोद्वारे कलापथकाच्‍या माध्यमातून जनजागृती अभियान

नागपूर : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्याने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोद्वारे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्यातील ब्राम्‍हणी गावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी रंगधून कलामंच, नागपूरच्‍या कलापथकातील प्रबोधनकार मोरेश्वर दंडाले, तसेच वाद्यवृंद आणि सहकलाकार स्वप्नील कठाने, तनीश बावने, रोशन खोब्रागडे, रत्ना साहू, सवित्रिबाई फुले च्या भूमिकेत शिवांगीनी मेश्राम, भारतमाताच्या भूमिकेत रजनी झाडे ह्या कलावंतानी देशभक्ति गीत, शहीदांची गौरव गाथा सादर करित स्वातंत्र्य सेनानी यांना मानवंदना दिली . यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी बागड़े , नगरपरिषद चे कार्यक्रम अधिकारी हातकाटे तसेच पोलिस पाटिल , ग्राम .पंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी उपस्थित होते . कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून हा कार्यक्रम सादर करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागपूर क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे तांत्रिक सहायक संजयतिवारी आणि संजीवनी निमखेडकर यांनी परिश्रम घेतले.

गडचिरोलीमध्ये सादरीकरण
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातही ठाणेगांव ग्राम पंचायतीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. – असर फ़ाउंडेशन, भंडारा कलापथकातील वैभव कोलते, विक्रम फडके, दिपक तिघरे, हर्षल कुंभारे, दामिनी सेलोकर, रागीनी बांते , प्रणाली नंदेश्‍वर ह्या कलावंतानी स्वातंत्र्य, लोकशाही, एकता यांचा जागर सांस्‍कृतीक कार्यक्रामाच्‍या माध्‍यमातुन जनसामन्‍यांपर्यंत पोहचविला . कार्यक्रमास जि.प. मुख्‍याध्‍यापिका, चांदेकर, शिक्षीका उताणे तसेच बहुसंख्‍येने नागरिक उपस्‍थित होते.