Published On : Mon, Sep 25th, 2017

पं. दिनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर: विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त संजय धिवरे, श्रीकांत फडके, सुधाकर तेलंग, बी. एस. घाटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.