Published On : Mon, Oct 15th, 2018

ड्रैगन पैलेस टेम्पलला येणाऱ्या भाविकांना योग्य सुविधा पुरवा

Advertisement

पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रैगन पैलेस टेम्पलला जवळपास 2 लाख भिम अनुयायी भेट देण्याची शक्यता आहे भाविकांची कोणतीही गैर सोय होणार नाही याची काळजी घ्यावी त्यांना योग्य सुविधा देण्यात याव्या असे निर्देश पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज सोमवारी दुपारी ड्रैगन पैलेस टेम्पल सभागृहात याबाबत आढावा बैठकीचे आयोजन कामठी येथे करण्यात आले होते. केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी आवश्यक सुविधा पुरविन्याची मागणी केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सागरपत्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष अल्लेवार, महावितरणचे अभियंता योगेश आमझरे, उपजिल्हा रुग्णालयच्या डॉ श्रद्धा भाजीपाले,डॉ शबनम खानूनी, न प चे उपमुख्यधिकारी नितिन चव्हाण, आरोग्य निरीक्षक विजय मेथिया,पाणीपुरवठा अधिकारी सागर गुंड,महसूल विभागाचे गणेश जमदाडे, आणि राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

महावितरण कंपनी खापरखेड़ा द्वारा 3 शुद्ध पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावण्यात येतील असे पालकमंत्री बावनकुले यांनी सांगितले. बाटलीबंद पिण्याचे पाणी भाविकाना निशुल्क पुरविन्यात येईल. महावितरण कोराडी कंपनी द्वारा ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात आवश्यक ठिकाणी तातपुरते विद्युत टॉवर उभारण्यात येतील त्याबद्दल आवश्यक निर्देश पालकमंत्री ना. बावनकुळे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement
Advertisement