Published On : Mon, Sep 23rd, 2019

निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावणा -या कर्मचा-यांना योग्य सुविधा द्या.

Advertisement

कन्हान : – येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.याकरिता शिक्षक व अन्य कर्मचा री मोठ्या प्रमाणावर नियुक्त केलेले आहे . मागील लोकसभेच्या निवडणुकीत नियोजनाच्या अभावामुळे झालेली अव्यवस्था व त्रासाची पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये या हेतूने नुकतेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उपमुख्य निवड णूक निर्णय अधिकारी मा.राजलक्ष्मी शहा हयाना निवेदन देऊन विस्तृत चर्चा केली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकस भा निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या शिक्षक व अन्य कर्मचा-यांना झालेली असुविधा व त्रास तथा यातच दुदैवाने अपघात होऊन गेलेले दोन शिक्षकांचे बळी याकडे मॅडमचे लक्ष वेधण्यात आले.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आणि निवेदनातील एकेक मुद्दयां वर सविस्तर चर्चा करण्यात आली. श्रीमती शहा यांनी पूर्ण वेळ देऊन संघटणे तर्फे मांडलेला प्रत्येक मुद्दा जाणीवपूर्वक समजून घेतला व येत्या निवडणुकीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटणे तर्फे उपस्थित केलेल्या मुद्दयाबाबत च्या सुचना सर्व आर ओ यांना देते व या निवडणुकीत कर्मचा-यां ना कोणत्याही प्रकारची असुविधा व त्रास होणार नाही विशेषतः महिला, अपंग, आजारी कर्मचारी याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने खालील मुद्द्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे केलेल्या मागण्या.
१) निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार निवडणूकीचे कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांना दुसरे दिवशी सुटी जाहीर करण्यात यावी.
२)सर्व मतदान केंद्रावर पुरेसे फर्नीचर, पंखे, लाईट,पाणी चाय,नास्ता,भोजन व रात्री आराम करण्यासाठी गाद्यांची व्यवस्था करण्यात यावी…
३)मतदान संपताच परत जाण्याकरीता बस,जिप्सी वेळेवर उपलब्ध व्हाव्यात.
४) मानधन निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या दराने सर्व विधानसभा क्षेत्रात सारखेच देण्यात यावे.
५) अपंग व आजारी कर्मचा-यांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात यावे.
६)महिलांना स्थानिक मतदान केंद्रावरच नियुक्ती देण्यात यावी व त्यांना रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवू नये.
७) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवड णूक साहित्य सामान परत घेण्याकरीता प्रचंड गर्दी होते त्यामुळे अधिकचे टेबल लावण्यात यावे.
८) राखीव कर्मचा-यांना मानधनाकरीता रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवू नये.
९) शक्यतो कर्मचारी ज्या विधानसभा क्षेत्रात कार्यरत आहे, त्याच विधानसभा क्षेत्रात (मुख्यालय वगळून) नियुक्ती देण्यात यावी.
१०) मतदानानंतर साहीत्य परत केल्या वर रात्री उशीर होत असल्यामुळे संकलन स्थळी भोजनाची व परत जाण्याकरीता निशुल्क व्यवस्था करण्यात यावी.
११) मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे मानधन अजूनही प्राप्त झाले नाही. हे थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे.

यावेळी शिष्टमंडळात शिक्षक नेते रामु गोतमारे, जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे, सिंधूताई टिपरे, भोलेश उईके, प्रेमचंद राठोड उपस्थित होते.

प्रत्येक निवडणूकीत शिक्षक राष्ट्रीय कार्य समजून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात.हे करत असताना योग्य सुविधा मात्र मिळत नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कर्मचा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यातच दोन शिक्षकांचा अपघाताने मृत्यू झाला. ग्रामपंचायत निवडणूकीचे कर्तव्य पार पाडलेल्या कर्मचा-यांचे मानधन अजूनही मिळाले नाही. त्यामुळे आम्ही संघटनेतर्फे केलेल्या मागण्यांवर अंमलबजावणी व्हावी. — धनराज बोडे, अध्यक्ष
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,जिल्हा शाखा नागपूर.

Advertisement
Advertisement