Published On : Thu, Sep 10th, 2020

खासगी व शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांना अधिक बेड उपलब्ध करावे : कुकरेजा

आरोग्य समितीच्या बैठकीत घेतला आढावा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयात बेडस उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यासाठी एक मॉनिटरिंग कमेटीचे गठन करण्यात यावे. ही समिती दररोज खासगी रुग्णालयांशी संपर्क करेल आणि कोव्हीड रुग्णांसाठी अधिक खाटा उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करेल, असे निर्देश आरोग्य समिती सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा यांनी कोव्हीड-१९ च्या आढावा सभेत गुरुवारी (१० सप्टेंबर) रोजी दिले.

वीडीयो काँफ्रेसिंगच्या माध्यमाने आयोजित आढावा सभाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती श्री. नागेश सहारे होते. श्री. कुकरेजा यांनी निर्देश दिले की खासगी रुग्णालयात खाटांची संख्या जास्त प्रमाणात आहे पण त्यांनी फक्त 3700 बेडस उपलब्ध करुन दिले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूरात अधिकचे बेडसची आवश्यकता आहे. व्हेंटीलेटर बेडस आणि आई.सी.यू. बेडसची संख्या पण जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे. त्यांनी आरोग्य विभागाला पॉजीटिव्ह रुग्णांना झोन निहाय कॉल सेंटरच्या माध्यमाने संपर्क साधण्याचे निर्देश दिले. सेन्ट्रलाईज सिस्टीम मध्ये दररोज 1200-1300 कोरोना रुग्णांना संपर्क करणे जड जात होते म्हणून झोन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे.

प्रत्येक झोनला ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिल्याबददल त्यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. त्यांनी खासगी रुग्णालयाकडून कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम डिपॉजीट करुन घेतल्याबददल नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोरोना मृतदेहावर स्मशान भूमीत घाटावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पीपीई किट ची बरोबर विल्हेवाट करण्याचे निर्देश दिले. सोबतच पॉजीटीव्ह पेशंटच्या घरातून कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे सुध्दा आदेश दिले. त्यांनी मनपा आयुक्तांना व्हीडिओ कॉफ्रेसिंगच्या माध्यमाने आरोग्य समितीची सभा घेणे अडचणीचे असल्यामुळे मोठया हॉल मध्ये सामाजिक अंतर ठेवून सभा घेण्याची अनुमती देण्यात यावी, अशी म.न.पा.आयुक्तांना समितीच्या वतीने विनंती करण्यात आली.

सभेत अतिरिक्त आयुक्त श्री.राम जोशी व श्री. संजय निपाणे, समिती सदस्य संजय बुर्रेवार, सरिता कावरे, आशा उईके, लिला हाथीबेड व वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ.विजय जोशी, टाटा ट्रस्ट चे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.