Published On : Thu, Sep 10th, 2020

विधानसभा अधिवेशनात वीज बिल माफी न केल्यामुळे आम आदमी पार्टी कडून वीज कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन

विधानसभा अधिवेशनात कोरोना काळाचा विजेचे बिल माफ झाले नाही म म्हणून आम आदमी पार्टी नागपुर द्वारे काटोल रोड स्थित वीज कार्यालयासमोर विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखेड़े यांच्या नेतृत्वात टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. विज कार्यालयाला लॉक लावण्यात आला. या शांतिप्रिय कार्यक्रमात पोलिसांनी आप कार्यकर्त्यन सोबत मारहाण केली. या आंदोलनात नागपुर संघटनमंत्री शंकर इंगोले व उत्तर नागपुर कॉर्डिनेटर रोशन डोंगरे यांनी महत्वाची भूमिका आमलात आणली. तसेच पश्चिम नागपुरचे संयोजक आकाश कावळे, राहुल कावळे व अलका पोपटकर यांनी सक्रिय भूमिका निभावली.

Advertisement

मा. मुखमंत्री श्री उद्धव ठाकरे, यांना राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत विज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३०% दर कपातीचे आश्वासन पूर्ण करण्याचे निर्णय घेण्यात यावेत यासाठी आम आदमी पार्टी कडून मा मुख्यमंत्री यांना दि ३ व २६ जून, १७ जुलै आणि ९ ऑगस्ट २०२० ला निवेदन दिले, क्रांती दिवसाला पालकमंत्र्यांच्या घराला घेराव केला, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेल भरो केले परंतु गार निद्रेत असलेले ठाकरे सरकार आजवर जागे झालेले नाही.

Advertisement

Advertisement

दोन दिवस घेण्यात येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात याबाबत जनहितार्थ निर्णय घेण्याची विनंती आम आदमी पार्टी कडून करण्यात आली होती, परंतु मिडिया प्रमाणे सरकार सुद्धा सुशांत, रिया आणि कंगना यांच्या विळख्यात आल्याचे दिसून आले, त्यामुळे कदचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल विचार करण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नाही असे दिसून येते.

संपूर्ण देशात आपल्या राज्यात जास्त भावाने वीज वसुली बंद करून आता तरी राज्यातील जनतेची लुट बंद करावी, आणि निवडणुकीपूर्वी दिलेले ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना ३०% स्वस्त वीज द्यावी यासाठी आम आदमी पार्टी कडून राज्यव्यापी टाळे ठोको आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून घेण्यात आले.

आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.

१.कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफीची घोषणा आपण स्वतः करावी

२.MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी,

३.आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे – ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे,

४.राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा,

५.वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,

६.कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेवून मागील वर्षीच्या याच कालावधीत जे वीज देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत.

या आंदोलनात खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते राज्य कोषाध्यक्षय श्री जगजीत सिंग, राज्य सहसचिव श्री अशोक मिश्रा, नागपुर सचिव श्री भूषण ढाकुलकर, श्री जय चौहान, श्री आकाश काळे, श्री विवेक चापले, श्री सचिन लोणकर, श्री पियुष आकरे, श्री हरीश गुरबानी, श्रीमती पुष्पा डबरे, श्री अमीर अन्सारी, श्री सचिन पारधी, श्री हरीश बन्सोड व इतर पार्टीचे कार्यकर्ते उपस्तित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement