Published On : Wed, Mar 21st, 2018

जनतेला चांगल्या आरोग्य सेवा पुरवा

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका शहरवासीयांना उत्तमोत्तम सुविधा पुरविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यात नागपूर महानगरपालिका आरोग्यविषयक सर्वोत्तम सेवा देण्यासाठी ओळखल्या जाईल. त्यामुळे मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवा. परिसरातील जागेत हिरवाई तयार करा. प्रसन्न वातावरण ठेवा आणि जनतेला चांगल्या आरोग्य सेवा पुरवा असे निर्देश मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

मनपा आरोग्य विभाग व टाटा ट्रस्ट यांच्यात झालेल्या करारानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या मनपाच्या दवाखान्यांचे रूप पालटणार आहे. त्या अनुषंगाने प्रथम चरणात सुरू होणाऱ्या आठ दवाखान्यांचे निरीक्षण मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांचेसोबत विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेवक यादव, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त हरिष राऊत, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजेश कराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता अनिल कडू, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, महेश सहारे, संतोष लोणारे, राकेश निकोसे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


प्रारंभी आयुक्त अश्विन मुदगल यांनी बेझनबाग इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर कपिलनगर नागरी आरोग्य केंद्र, नंदनवन नागरी आरोग्य केंद्र आदींचे निरीक्षण केले. दुसऱ्या टप्प्यात आयुक्तांनी उर्वरीत दवाखान्यांचे निरीक्षण करून आढावा घेतला. या निरीक्षण दौऱ्यात त्यांनी नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. तेथील अत्याधुनिक नोंदणी केंद्र, वैद्यकीय तपासणी कक्ष, औषधालय, स्त्री व बालरोग कक्ष आदी व्यवस्थेची पाहणी केली.

या निरीक्षण दौऱ्यानंतर आयुक्त श्री. मुदगल यांनी कपिलनगर माध्यमिक शाळेचेसुद्धा निरीक्षण केले. तेथील शौचालय, बाथरूम व परिसराचे निरीक्षण केले. कपिलनगर तसेच मनपाच्या अन्य सर्व शाळांमधील शौचालयांची नियमित स्वच्छता करण्यात यावी. औषध फवारणी करण्ळात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. नव्याने बांधण्यात येत असलेल्या बस्तरवारी झाडे चौक स्थित सतरंजीपुरा झोनच्या नव्या प्रशासकीय बांधकामाचेसुद्धा त्यांनी निरीक्षण करून कामाची प्रगती जाणून घेतली.

Advertisement
Advertisement