Published On : Fri, Sep 29th, 2017

पावसाच्या अभावामुळे नुकसान ग्रस्त धान उत्पादक शेतक-यांना आर्थिक मदत द्या.

कन्हान : पारशिवनी तालुक्यात निसर्गाचा पाऊस वेळेवर व व्यवस्थित न पडल्याने तसचे पेंच धरणांचेही पाणी शेती करिता न मिळाल्याने यावर्षीच खरीप हगाम पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास्तव तालुक्यात शेताचे सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्त शेतक-यांना शासनाकडुन आर्थिक सहाय्य मिळवुन दयावे. अशी मागणी तहसिलदार पारशिवनी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यानी केली आहे.

दशरा, दिवाळी सण आला परंतु यावर्षी पाऊस वेळेवर व व्यवस्थित न आल्याने तसेच पेंच, तोतलाडोह धरणां सामोर मध्य प्रदेशात चौराई मोठे धरण बाधण्यात आल्याने पेंच, तोतलाडोह धरणात मुबलक पाणी साठा जमा होऊ न सकल्याने धरणांचेही पाणी न सोडल्याने पारशिवनी तालुक्यातील धान उत्पादक शेतक-याचे धानाचे परे सुकले,यामुळे बहुतेक शेतकऱ्याची धानाची रोहिणी, लावणी झाली नाही. काही शेतकऱ्यानी कसेतरी लावलेले धान पाण्याच्या अभावामुळे तेही जगु शकले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारिरीक नुकसान झाले.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आता महत्वाचे सण सुध्दा अंधारात असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. करिता शासनाच्या यंत्रणेने त्वरित शेतीचे योग्य सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्त शेतक-याना शासना व्दारे आर्थिक मदत मिळवून द्यावी. अशी मागणी शेतकऱ्याचे शिष्टमंडळ मा. अक्षय पोयाम तहसिलदार पारशिवनी यांना भेटून निवेदन देऊन करण्यात आली आहे. शिष्टमंडळात प्रामुख्याने श्री लक्ष्मीकांत मोहन काकडे ( ग्रा.पं.सदस्य. वराडा- वाघोली ) भिमराव काकडे, चंद्रशेखर पौनिकर, रामराव बंड, आत्माराम उकुंडे, अभय हेटे, हेमराज काकडे, मोरेश्वर डोंगरे, नरेंद्र ठाकरे, प्रभाकर खंडार, गोविंदा खोब्रागडे, दिनेश बंड, विजय कोहळे, यादोवराव काकडे आदी शेतकऱी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement