Published On : Fri, Sep 29th, 2017

वीज कर्मचाऱ्याकडून दीक्षाभूमीवर भोजनदान

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: पवित्र दीक्षा भूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी वीज कर्मचाऱ्याकडून येत्या १ ऑक्टोबर रोजी माता कचेरी परिसरात भोजनदानाचा कार्यक्रम ओयोजित केला आहे. सकाळी ८ वाजता महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

सादर कार्य्रक्रमासाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे योगदान राहिले आहे. मागील १५ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम राबवल्या जातो आहे.

कार्यक्रमास मुख्य अभियंता रफिक शेख, किशोर मेश्राम, अरविंद भादीकर, जिजोबा पारधी, दिलीप घुगल आदींसह वीज विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील.