Published On : Mon, Apr 9th, 2018

मनपाच्या १०६ स्वच्छता कर्मचा-यांना नियुक्ती पत्रक प्रदान


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या निवृत्त झालेल्या स्वच्छता कर्मचा-यांच्या १०६ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले. सोमवार (ता.९.) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचा-यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, राजेश हाथीबेड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० कर्मचा-यांना नियुक्ती पत्रके वाटण्यात आले. अन्य लाभार्थ्यांना समिती सभापती मनोज चापले आणि आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रके वाटप करण्यात आले.

यामध्ये भारती मेश्राम, सुषमा वानखेडे, गौरी पंडित, संघमित्रा मेश्राम, संगीता बक्सरे, दिनेश अलोणे, सिद्धार्थ पाटील, विजय लोखंडे, भगवान उके, विशाल दुबे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करून त्यांना कामावर रूज करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, चांगले काम करा, स्वच्छतेसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला.