Published On : Mon, Apr 9th, 2018

दक्षिण-पश्चिम नागपुरात बुधवारी वीज बंद

Mahavitaran Logo Marathi
नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात बुधवार दिनांक 11 एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत मालवीय नगर, पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, स्नेह नगर, खामला, सिंधी कॉलनी, सावरकर नगर, व्यंकटेश नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते ११ या काळात महाजन मार्केट, मीना बाजार, सुपर मार्केट,माटे चौक, आठ रास्ता चौक, लक्ष्मी नगर, त्रिमूर्ती नगर, शहाणे ले आऊट, गोरले ले आऊट, नेलको सोसायटी येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवाजी नगर, रामनगर, दीनदयाल नगर, स्वावलंबी नगर, पडोळे ले आऊट, त्रिमूर्तीनगर बगीचा, लोकसेवा नगर, प्रियदर्शिनी नगर येथील तर सकाळी ८ ते १० या वेळेत गांधी नगर,कार्पोरेशन कॉलनी, तेलंगखेडी, मरार टोळी, अमरावती रोड परिसर, चिंच भवन, सोमलवाडा, राजीव नगर, मुळीक कॉम्प्लेक्स, विदर्भ डिस्टीलरीस या परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.