नागपूर : नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच बाधितांची संख्यापण वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यापरीने अंदाजे १००० अतिरिक्त खाटांची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौर श्री.दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला दिले.
शहरात दररोज २५०० ते ३००० नागरिक कोरोना बाधित होत आहे. तसेच ॲक्टींव्ह केसेसची संख्या २४ हजाराचे वर गेली आहे. आतापर्यंत ३००० च्या जवळपास नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. ही गंभीर परिस्थीती लक्षात घेता महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले आहे की सध्या कार्यरत खाजगी रुग्णालयांमये अतिरिक्त कोव्हिड बेडसची संख्या वाढविण्याकरीता परवानगी देण्यात यावी.
सोबतच शहरातील नॉन कोव्हिड हॉस्पीटलल्सना कोव्हिड रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. इंदिरा गांधी रुग्णालय (मेयो) मध्ये वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तेथे अतिरिक्त डॉक्टर्स व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात यावी. मनपाचे पाचपावली येथील स्त्री रुग्णालय मध्ये कोव्हिड रुग्णांकरिता तळ मजल्यावर व्यवस्था त्वरीत सुरु करण्यात यावी.