Published On : Mon, Mar 22nd, 2021

हंसापुरी खदान येथे लसीकरण सुरु

नागपूर : महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हंसापुरी खदान आयुर्वेदिक दवाखाना परिसर मधे नागपूर महानगरपालिके तर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात सोमवार (२२ मार्च) रोजी करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय बालपांडे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.ख्वाजा, श्री. जितेश पाटिल, रमाकांत गुप्ता, अविनाश साहू उपस्थित होते.