Published On : Wed, Aug 5th, 2020

ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचा अभिमान : महापौर संदीप जोशी

नागपुर – शहराचे प्रथम नागरिक संदीप जोशी म्हटले कि अयोध्येतील राम मंदिर हे भारत देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न होते. ५ ऑगस्ट या दिवसाच्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल पडले आहे.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला राम मंदिर पायाभरणी सोहळा संपूर्ण देशानेच नव्‍हे तर जगाने ‘याचि डोळा’ अनुभवला. देशातील सर्वच शहरे उत्सवासारखी सजविण्यात आली होती.

Advertisement

या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार माझ्यासह आजची पिढी झाली, याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक पिढ्यांनी पाहिलेले हे स्वप्न पायाभरणीच्या निमित्ताने लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement