Published On : Sat, Jun 26th, 2021

ओबीसी आरक्षणाच्याया मुद्द्यावरून कांग्रेस चे काळी फीत बांधून निषेध आंदोलन

कामठी:-स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून कांग्रेस आता आक्रमक झाली असून राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षणेते आरक्षणाच्या प्रश्नावर खोटे बोलत असल्याचा आरोप कांग्रेस ने करीत केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून कांग्रेस च्या वतिने आज 26 जून ला आयोजित राज्यव्यापी आंदोलनाला कामठी कांग्रेस तर्फे पाठींबा देत कामठी कांग्रेस कार्यालयात काळी फिती बांधून केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी कामठी कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, कांग्रेस सेवादल महाराष्ट्र प्रदेश सहसचिव राजकुमार गेडाम, सेवादल कामठी शहर अध्यक्ष मो सुलतान , अजय गेडाम, अब्दुल सलाम अन्सारी, नगरसेवक अफरोज , सुरेय्या बानो यासह कांग्रेस चे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.