Published On : Sat, Jun 26th, 2021

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन यशस्वी

Advertisement

.पुतळा दहन कार्यक्रमाचा फुसका बार ठरविण्यात पोलिसांना यशप्राप्त

कामठी : ओबीसींचे सर्वोच्च न्यायालयात रद्द झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासाठी आज राज्यातील 1000 ठिकाणी भाजप तर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या पाश्वरभूमीवर आज 26 जून ला सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालय समोर भाजप तर्फे माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित चक्काजाम ला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आंदोलन यशस्वी ठरले दरम्यान राज्य शासनाचा विरोध दर्शविण्यासाठी शासनाचा पुतळा दहन कार्यक्रम हा पोलिसांच्या तर्कशक्तीमुळे सदर पुतळा दहन कार्यक्रम फुसका बार ठरविण्यात पोलिसांना यशस्वी ठरले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या चक्काजाम आंदोलनात भाजप पदाधिकारी अणिल निधान, भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले, भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया, माजी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, महादूला नगर पंचायत चे अध्यक्ष राजेश रंगारी, पंचायत समिती सभापती उमेश रडके, जी प सदस्य मोहन माकडे, माजी सरपंच मनीष कारेमोरे, पावंनगाव ग्रा प सदस्य किरण राऊत, सरपंच मंगला कारेमोरे, सरपंच भावना चांभारे, पंचायत समिती सदस्य सविताताई जिचकार,नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक कपिल गायधने, कोंडुलवार, हर्षद अढाऊ, पंकज वर्मा, चेतन खडसे,रवी चमके,रमेश वैद्य, राजेश देशमुख, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाची सामूहिक राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.आंदोलना दरम्यान कुठलीही अनुचित घटना न घडत कायदा व सुव्यवस्था नोयंत्रणात राहावी यासाठी एसीपी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक विजय मालचे, वाहतूक पोलीस निरीक्षक मत्ते यांच्या मुख्य उपस्थितीत पोलिसांचा विशेष चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

Advertisement
Advertisement
Advertisement