Published On : Sat, Mar 17th, 2018

प्रभावी प्लम्बिंग रचनेतून पाण्याचा सुयोग्य वापर शक्य

नागपूर: इंडियन प्लम्बिंग असोसिएशन तर्फे नुकताच जागतिक प्लम्बिंग दिन साजरा करण्यात आला. या वेळी त्यांच्या १७व्या चॅप्टर अर्थात नागपूर चॅप्टर चे उदघाटन करण्यात आले. इंडियन प्लम्बिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गुरमीतसिंग अरोरा यांनी १९९३ मध्ये स्थापन झालेले आयपीए यंदा रौप्य महोत्सव साजरा करीत असल्याचे सांगितले. इमारतींच्या निर्माण कार्यात पाण्याच्या उपयोगाबाबत नियंत्रण आणि काळजी घेण्याची गरज आहे असे त्यांनी म्हंटले. पाण्याची कमतरता हे जगाला भेडसावणारे मोठे संकट असल्याचे ते पुढे म्हणाले.मोठ्या इमारतींमंध्ये योग्य झोनिंगच्या माध्यमातून प्रेशर आणि फ्लो या दोन्हीच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्लम्बिंग हा अगदी तांत्रिक विषय असून ग्रीन बिल्डिंग मध्ये पाण्याचा पुनर्वापर करणारे तंत्रज्ञान वापरल्या जात आहे. यातही प्लम्बिंग फार महत्वाची भूमिका बजावते असे त्यांनी सांगितले.

नागपुरात देखील पायाभूत सुविधांचा विकास होत असून त्यात प्लम्बिंगच्या योग्य पद्धतींचा वापर होणे गरजेचे असल्याचे नागपूर चॅप्टर चे अध्यक्ष श्री शंकर घिमे यांनी सांगितले. या वेळी पंप्स मधील आधुनिक बदल आणि त्याची निर्माण उद्योगातील उपयोगिता यावर श्री विनोद पवार यांनी तांत्रिक परिषद घेतली.

आयपीए चे १६ अन्य शहरात चॅप्टर्स असून ३००० पेक्षा अधिक सदस्य आहेत.