Published On : Fri, Sep 30th, 2022

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

Advertisement

नागपूर: जागतिक अहिंसा दिन आयोजन समितीच्या वतीने रविवारी, (ता. 2 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता व्हेरायटी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर भजनगीतांद्वारे स्वरसमुनांजली वाहिली जाईल.

महात्मा गांधी यांनी जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखविला. वैश्विक एकता व मानवकल्याणासाठी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. त्यामुळेच त्यांची जयंती जगभर अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. देशामध्ये सामाजिक एकता, बंधुता टिकवून ठेवण्यासाठी गांधीजींनी सांगितलेला सर्वधर्मसमभाव प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजामध्ये गांधी विचार रुजावा व नव्या पिढीला गांधी तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने दरवर्षी जयंतीला अभिवादन कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पूर्व केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे.