Published On : Mon, Apr 30th, 2018

येसंबा येथील मुख्याध्यापक मोहने शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

कन्हान: येथून जवळच असलेल्या येसंबा येथील जिल्हा परीषद शाळेचे उपक्रम व कृतीशील मुख्याध्यापक गुलचंद मोहने यांना नुकतेच पारशिवनी पंचायत समिती मधून शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले.

नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा नागपूरच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील तेरा पंचायत समितीतील तेरा कृतीशील शिक्षकांना पद्मभूषण शिक्षणत्ज्ञ ताराबाई मोडक शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मातीत करण्यात अाले. शिक्षक अामदार नागोजी गाणार, संघटनेचे राज्य सरचिटणीस उमेश गोदे,नागपूर विद्यापीठचे माजी कुलगुरू हरीभाऊजी केदार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात अाला.


मोहने सरांनी येसंबा येथील जिल्हा परीषद शाळा तालूक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावारूपास अाणलेली अाहे.त्यांच्या कार्याची खरी दखल घेवून संघटनेने त्यांना पुरस्कार दिल्याचे बोलले जात अाहे.पारशिवनी पंचायत समिती मधून मोहने सराना शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात अाल्याबद्दल येसंबा व कन्हान परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .