Published On : Fri, Jul 19th, 2019

प्रियंका गांधीच्या अटकेचा नागपुरात निषेध

नागपूर : अ.भा.काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे देवडिया काँग्रेस भवनासमोर शुक्रवारी निर्देशने करण्यात आली. चिटणीस पार्क ते अग्रसेन चौकपर्यंत रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात ‘मोदी योगी मनोरोगी’ असे नारे लावण्यात आले.

निषेध आंदोलनाचा समारोप देवडिया काँग्रेस भवनात झाला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, बंटी शेळके, डॉ.गजराज हटेवार, दिनेश बानाबाकोडे, रमण पैगवार, हरीश ग्वालबंशी,उज्ज्वला बनकर, मोतीराम मोहाडीकर, नंदा पराते, डॉ.विठ्ठल कोंबाडे, रवी गाडगे, जगदीश गमे, प्रवीण आगरे, धरम पाटील, इर्शाद मलिक, बॉबी दहीवाले, अजय नासरे, पंकज निघोट, सुजाता कांबाडे, आकाश तायवाडे, बिना बेलगे, अशोक निखाडे, श्रीकांत ढोलके, रुबी पठाण, शमशाद बेगम, मनोज चावरे, विजया ताजणे, रजत देशमुख, राजेश कुंभलकर, मनोज वाळके,राहुल मोरे, नवीन सहारे, सुनील गुलगुलवार, जॉन थॉमस, वसीम खान यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले.

संविधान चौकातही आंदोलन
संविधान चौकात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस व एनएसयुआयतर्फे आयोजित या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात जिया पटेल, राहुल पुगलिया, संजय दुबे, आयशा उईके, कमलेश चौधरी, दिनेश यादव, परसराम मानवटकर, राकेश निकोसे, किशोर जिचकार, निजाम भाई, सुरेश जग्यासी, ठाकूर जग्यासी, कांता पराते, कमलेश समर्थ, अजित सिंह, वासुदेव ढोके, धीरज पांडे, गौतम अंबादे आदींनी भाग घेतला.