Published On : Fri, Jul 19th, 2019

अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज-अंकुश बावणे #किरमीटी भारकस येथे साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मृतीदिन साजरा

Advertisement

टाकळघाट: येथून अगदी ४ किमी अंतरावर असलेल्या किरमिटी भारकस येथे ग्राम नागरिक सेवा समिती आणी साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मारक समिती याच्या संयुक्त विदयमाने विश्व साहित्यिक,प्रथम शिवशाहीर,दलीत व विद्रोही साहित्याचे जनक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा निमित्य सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शत कोटी भावपुर्ण अभिवादन करण्यात आले. ग्राम नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष व साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव श्री अंकुश बावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अण्णा भाऊ साठे यांच्या जिवणावरती प्रकाश टाकताना १८जुलै १९६९ रोजी पावसाळ्यात एका कुंद सकाळी चिरागनगर (मुंबई) येथील राहत्या झोपडीत या माहामानवाचा श्र्वस थांबला.अण्णा भाऊंनी त्याच्या पुस्तक प्रकाशकांना आणी चिञपट निर्मात्यांना श्रीमंत केलं पण स्वता: माञ कफल्लक राहीले.

ते दलित श्रमिक कामगार आणी समस्त वंचितांचा बुलंद आवाज होते. तर ग्राम नागरिक सेवा समितीचे सचिव श्री बाबाराव मडावी यांनी अण्णाभाऊ यांनी वास्तववादी साहित्य निर्माण करतांना मानवी जिवन संर्घष व मानवतावाद हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख सुञ होते त्यांच्या कथा,कृदंबर्‍या,आणी शाहीरी लोकनाट्याचे अनेक भारतीय व परदेशी भाषा मध्ये भाषांतर झाले आहे.

रशिया सारख्या मोठ्या देशात त्यांचा मान सन्मान करण्यात आला होता.आपल्या देशा प्रमाने रशियन जनतेचे ते लोकप्रिय साहित्यिक असल्याचे सांगितले.या प्रसंगी ग्राम नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष अंकुश बावणे,उपाध्यक्ष विजय थेटे सचिव बाबाराव मडावी,सहसचिव हेमंत साने,कोषाध्यक्ष हेमदास मशाखेञी, विनोद राॅय,प्रशांत गेडाम, तुलशिराम दुधे,संजय उपरिकर,सागर कळणे, जितेंद्र ढोये वंदना बावणे पुष्पा साने,सारिका कळणे, आशा ढोये व अनेक नागरिक उपस्थित होते.