Published On : Wed, Feb 5th, 2020

प्राथ. शिक्षक संघा तर्फे जि प अध्यक्षाचा सत्कार

कन्हान : – महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ तालुका पारशिवनी जिल्हा नागपुर च्या वतीने नागपुर जिल्हा सरचिटणीस वामन पाहुणे यांंच्या नेतुत्वात नुकताच जि प नागपुरच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ रश्मी ताई श्यामकुमार बर्वे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबि त प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने मागील वर्षातील चार महिन्या चा थांबविलेला घरभाडे भत्ता काढण्या विषयी संघटनेच्या वतीने विनंती करण्या त आली. यावर बोलताना मा अध्यक्षानी सांगितले की हा विषय स्थायी समिती च्या सभेत घेऊन शिक्षकांचा थांबविलेला घरभाडे भत्ता काढण्यासाठी विशेष प्रय त्न करण्याचे आश्वासन संघटनेला दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका मार्गद र्शक प्रकाश रंगारी यांनी तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष सुनिल कळंबे यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वामन पाहुणे, तालुका नेते रामभाऊ भक्ते, सरचिटणीस दिपप्रकाश वालोंद्रे, प्रदिप चौधरी, दिलीपसिंग बागडी, नथ्थु लंगडे, रामु गि-हे, सुधाकर हटवार, रामराव जामदार, सुरेंद्र ठाकरे, चितामण बेलेकर, श्रावण लांजेवार, सुनंदा भगत, प्रमिला नागपुरे, चंद्रकला लांजेवार, लता वंजारी, ललिता लांजेवार व संघटनेचे ईतर पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.