Published On : Thu, May 10th, 2018

घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य – अश्विन मुदगल

Ashwin-Mudgal

Ashwin Mudgal

नागपूर: जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंतर्गत बाधित क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील प्रस्ताव सादर करताना पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांचा विकासाला प्राधान्य देवून त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठान प्रबंधन समितीची बैठक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, समितीच्या सदस्या ॲड. लिना बुधे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीराम कडू, तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा खनिज विकास निधीतून 135 कोटी रुपये उपलब्ध असून यापैकी 85 कोटी रुपयाच्या प्रस्तावाना मान्यता देण्यात आली असून त्यानुसार कामांना सुरुवात झाली आहे. खनिज विकास निधी अंतर्गत घेण्यात आलेले सर्व कामे चांगल्या दर्जाचे व्हावेत व नियोजित वेळात पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, उपलब्ध निधीमधून विभाग प्रमुखांनी प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामाची निवड करावी व त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावी या कामांमध्ये बाधित क्षेत्रातील कामांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खनिज विकास निधी अंतर्गत पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, महिला व बाल कल्याण, शिक्षणांतर्गत डिजीटल कलॉस रुम तयार करणे, वरिष्ठ नागरिक व विकलांगसाठी सुविधा पुरविणे, तसेच भौतिक पायाभूत विकास यावर 85 कोटी 82 लक्ष रुपयाचे निधी मंजूर करण्यात आला आहे.

पर्यावरण व स्वच्छता या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी पारशिवनी, कन्हान पिपरी आदी ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे. तसेच डिजीटल कलॉस रुमसाठी 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पिण्याचे पाणी पुरवठयासाठी 16 कोटी 48 लाख, आरोग्य सुविधांच्या विकासाठी 10 कोटी 60 लाख, महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत विविध योजनासाठी 2 कोटी 94 लाख तसेच वरिष्ठ नागरिक व विकालांगासाठी 4 कोटी 50 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार संबंधित विभागाने निधी उपलब्ध करुन देण्यात येवून कामांना सुरुवात झाली आहे. भौतिक सुविधांच्या सुविधांच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला आहे.

प्रारंभ जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीराम कडू यांनी स्वागत करुन जिल्हा खनिज निधीअंतर्गत निधीची उपलब्धता व विभागाना वितरीत केलेल्या निधींची माहिती दिली.