Published On : Wed, Jun 10th, 2020

प्राथमिक शाळा ऑक्टोबर पर्यंत उघडू नये.. राष्ट्रीय जन सुराज्य पार्टी यांची मागणी

नागपूर:-केंद्र व राज्य शासनांनी नर्सरी,अंगणवाडी, प्राथमिक शाळा व सी.बी.एस.सी. शाळा ऑक्टोबर महिन्या पर्यत उघडू नये अशी मागणी राष्ट्रीय जन सुराज्य पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजेश जी काकडे यांनी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, मानव संसाधन मंत्रालय यांना केली आहे..

भारत देशा मध्ये कोरोना ने सर्वत्र नागरिकांना हादरून टाकल आहे व महाराष्ट्र राज्यात याचे जास्त प्रमाण आहे तसेच याचा प्रादुर्भाव ६७ ते ७० हजार कोरोना पॉझिटिव्ह प्रेशनट राज्यात प्राप्त झाले आहे याचा प्रभाव थांबविण्यासाठी कित्येक उपाय करण्यात येत आहे,हॉस्पिटल कॉर्नटाईन,होम कोरोन्टाईन करून या रोगाला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे..राज्य शासनाने नर्सरी,अंगणवाडी हे वर्ग सातव्या वर्गा पर्यंत शाळा,ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखे पर्यंत बंद ठेवण्यात घेऊन तीच पर्यत शाळा उघडण्याचा आराखडा तयार करून दूरदर्शन या वाहिनी द्वारे शिक्षणाची व्यवस्था व अभ्यास क्रम चे वेळापत्रक तयार करून दूरदर्शन द्वारे तिथं पर्यत शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करावी ज्यामुळे कोरोना चे प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल.

कारण प्रॉन्स, इब्राईलव इतर पाश्चिमात्य राष्ट्रा मध्ये शाळा उघडल्यामुळे मुला मध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेंशन ची संख्या वाढलेली आहे आसपास आग्रही भूमिकेतून केंद्रात व राज्यात शाळा सुरू केल्या तर मोठ्या प्रमाणात मुलां मध्ये हा रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते मुलांचा मृत्युदर वाढु शकतो व कुटूंबात याची लागण होऊन याचा प्रसार पूर्ण गावात ब शहरात होऊ शकतो.. राष्ट्रीय जन सुराज्य पक्षा तर्फे प्रधानमंत्री, मानव संसाधन मंत्री,राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना आव्हान करण्यात येत की त्यांनी १५ ऑक्टोबर पर्यत बंद ठेवण्यात येऊन नंतर नर्सरी अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा तिथं पर्यंत दूरदर्शन या वाहिणीद्वारे सी बी एस सी व स्टेट बॉर्ड यांच्या शिक्षणाचे वेळापत्रक यावी अशी मागणी केली आहे.

तसेच या मागणीला दुजोरा पक्षाचे महासचिव श्री.चंद्रभान जी रामटेके,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौ. प्रिती ताई डंभारे ,जनबा जैन उलाह शाहा, श्री शँकर बर्मन, श्री अजय शर्मा,श्री रोशन शाहू,श्री शिवप्रसाद राऊत,शहर युवा अध्यक्ष जनबा फरीद शेख,विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री.तारेश दुरुगकर,विदर्भ महिला अध्यक्ष अनिता भिवगडे,मिना राव,कमल बन्सल,वैभव रामटेके इत्यादी नी ही मागणी शासनास केली आहे..