Published On : Thu, Jan 31st, 2019

अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी ह्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडून निर्लज्ज पानाचे प्रदर्शन करणाऱ्या अखिल भारतीय हिंदूमहा सभेच्या कृत्याचा निषेध!!

Advertisement

नागपूर शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी तर्फे गुरुवार दि. ३१.०१.२०१९ रोजी स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून महात्मा गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास हिंदू महासभेची सचिव पूजा पांडे हिने गोळ्या झाडून गोडसे प्रवृत्ती दर्शविल्यामुळे व्हेरायटी चौक येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर शर कॉंग्रेस कमिटी तर्फे हिंदू महा सभा व त्याच्या सर्व सहकाऱ्यांवर अटक करून देश द्रोहाचा खटला चालविण्यात यावा अश्या प्रकारची तक्रार बर्डी पोलिस स्टेशन येथे करण्यात आली व मा. जिल्हधिकारी साहेब यांना शहर कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे असे म्हणाले कि जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पूर्ण पाठबळ असलेल्या संघटना हिंदू महासभा, विश्वहिंदू परिषद, रा.स्व.संघ ह्या जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य हे अप्रत्यक्ष पणे करीत असतात. त्याचा नयनात करण्या करिता कॉंग्रेस पक्ष सदैव जनसामन्यांच्या पाठीशी राहील, तर माजी खासदार विलास मुत्तेमवार म्हणाले, गोडसे प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो ७० वर्ष अगोदर घडलेली घटना म्हणजे महात्मा गांधी यांची निर्घुण हत्या होय.

काल संपूर्ण जगात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचे पुण्यतिथी साजरी करण्यात आली, त्याच वेळी हिंदू महासभेतर्फे गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गोळ्या घालून रक्त दाखविण्याचा अशोभनीय प्रकार त्यांनी केला. आजच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रामुख्याने शहर अध्यक्ष विकास ठाकरे, विलास मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, शेख हुसेन, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, दीपक वानखेडे, गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, रमेश पुणेकर, रामगोविंद खोब्रागडे, किरण गडकरी, विठ्ठलराव कोंबडे, उज्वला बनकर, विवेक निकोसे, श्रीकांत ढोलके, पंकज लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता ब्लोच्क अध्यक्ष पंकज निघोट, आशिष नाईक, विलास भालेकर, देवेन्द्रसिह रोटेले, राजकुमार कमनानी, पंकज थोरात, सुरेंद्र रॉय, छाया सुखदेवे, अब्दुल शकील इर्शाद मलिक, जावेद खान, राकेश गुप्ता, इरफान काजी, गोपाल पटटम, प्रशांत पाटील, युगल विदावत, विश्वेश्वर अहिरकर, सुजाता कोंबाडे, बॉॅबी दहिवले, सुनिल दहीकर, हर्ष सुखदेव शिव, प्रकाश ढगे, आशा शिंगोटे, स्नेहल दहीकर, अभय रणदिवे, प्रवीण गवरे, सुनिता ढोले, साहेबराव देशमुख, राजेश ढेंगे, शुभाश मानमोडे, कमाल मुखर्जी, प्रशांत ढाकणे, आलोक मून, अल्ताफ शेख, अभय सोम्कुले, आकाश तायवाडे, जिवेश व्यास यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्याकार्माचा समारोप गांधीजींच्या “रघुपती राघव राजाराम“ हे भजन सामुहिक रित्या गावून करण्यात आला.