Published On : Tue, Oct 10th, 2017

वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय योगदानाबद्दल डॉ. महादेव मेश्राम यांना राष्ट्रपतीच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान

Advertisement

Dr Mahadeorao Meshram
नागपूर:
आरोग्य सेवेत उल्लेखनिय योगदानाबद्दल तसेच आदिवासी व अनाथांसाठी केलेल्या अतुलनिय सेवेबद्दल डॉ. महादेव मेश्राम यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. सुप्रसिध्द न्युरॉलाजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचे डॉ. महादेव मेश्राम वडील आहेत.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन वैयक्तिंना वयोश्रेष्ठ सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नागपूर जिल्हयातील डॉ. महादेव मेश्राम यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भावरचंद गहलोत, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, तसेच सचिव जी. लताकृष्ण राव उपस्थित होते.

डॉ. महादेव मेश्राम यांनी नागपूर येथील रोबर्टसन मेडीकल स्कूल मधून आरोग्य विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून 1958 पासून आरोग्य अधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाले होते. त्यांनी गडचिरोली सारख्या आदिवासी भागात आरोग्य सेवेचे कार्य केले असून जळगाव आदी जिल्हयात आरोग्य अधिकारी म्हणून काम केले आहे.

आपत्ती काळात पूरग्रस्त क्षेत्रातील लोकांसाठी वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध करुन देणे, कृष्ठरोग्यांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने डॉ. मेश्राम यांना 1982 व 1985 मध्ये प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही ज्येष्ठ नागरिक तसेच वृध्दाश्रमातील नागरिकांना नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देत आहेत. त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून केंद्र शासनाने डॉ. महादेव मेश्राम यांना वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देवून गौरव केला आहे. पुरस्कार वितरण समारंभास सौ. मेश्राम, तसेच सुप्रसिध्द न्युरो सर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते.