Published On : Tue, Oct 10th, 2017

‘ व्यसन हे एक अभिश्राप ’ – डाॅ. प्राजक्ता गुप्ता

Advertisement

नागपूर: व्यसन हे व्यक्तीस लागलेला एक अभिश्राप आहे या अभिश्रापातुन मुक्त करायचे सार्मथ्य हे व्यसनमुक्ती केंद्रात आहे असे प्रतिपादन डाॅ. प्राजक्ता गुप्ता, वैद्यकिय अधिकारी, लोहमार्ग पोलिस अजनी, नागपूर यांनी सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात दिलेल्या भेटीत आपले मत लाभाथ्र्यासमोर मांडले.

जागतिक मानसिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधुन गुरुकुलला दिलेल्या भेटीत लाभाथ्र्यासोबत संवाद साधला व त्यांच्याकडून व्यसनी होण्याचे कारणे समजुन घेतली. व्यसनापासुन नैराश्य आलेल्या व्यक्तिच्या जीवनात सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र हे जादुई काम करीत आहे असे त्या म्हणाल्या. लाभाथ्र्यासोबत बोलतांना त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकला, त्यांत त्यांनी व्यसनाधिन व्यक्तिच्या परिवारातील सदस्याना होणरा त्रास व त्यांच्यासमोर उभे राहनारे प्रश्न लाभाथ्र्यासमोर मांडले व व्यसनमुक्त होण्याचे आवाहन त्यांनी लाभाथ्र्याना केले.

डाॅ. प्राजक्ता गुप्ता यांनी दिलेल्या भेटीबद्दल समुपदेशन संचालक डाॅ. शर्मिष्ठा गुप्ता यांनी आभार मानले.