Published On : Tue, Jun 12th, 2018

पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनातील विविध मागण्यांचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर

Advertisement

मुंबई: केंद्र व राज्यसरकारच्या पश्चिम महाराष्ट्र विरोधी भूमिकेचा निषेध करुन पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेली विकासप्रक्रिया सुरु करण्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या,जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात २ ते १२ एप्रिल रोजी सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन केले होते.

सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी आणि राज्यातील जनतेला न्याय दयावा यासाठी विविध मागण्यांचे निवेदन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पुणे विभागीय आयुक्त दिपक मेसेकर यांना आज देण्यात आले. यावेळी अजितदादांनी विभागीय आयुक्तांशी विविध विषयांवर आणि मागण्यांवर चर्चा केली.

हे निवेदन देताना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय देवकाते, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, पुणे मनपा नगरसेवक बाबुराव चांदेरे, सांस्कृतिक सेलचे प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, पुणे शहर माजी कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे माजी शहराध्यक्ष,रवींद्र माळवदकर, माजी आमदार कमल ढोलेपाटील, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरेपाटील, पुणे मनपा विरोधी पक्षनेता चेतन तुपे, लिगल सेलचे अध्यक्ष अँड.भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.