Published On : Fri, Aug 16th, 2019

‘व्हॉईस ऑफ विदर्भ’ची प्राथमिक फेरी आजपासून

नागपूर : नागपूर महानगरपालिका, आई कुसुम सहारे फाउंडेशन व लकी म्यूझीकल इंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’ दुस-या पर्वाच्या प्राथमिक फेरीला उद्या शनिवार (ता.१७)पासून सुरूवात होत आहे. शनिवारी (ता.१७) व रविवारी (ता.१८) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल.

विदर्भातील ३ ते १५, १६ ते ४० आणि ४१च्या वरील वयोगटातील गायक कलावंतांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणा-यांना प्रवेश नि:शुल्क आहे. २५ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शंकरनगर येथील साई सभागृहामध्ये स्पर्धेची उपांत्य फेरी व ३१ ऑगस्टला रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी होईल.

अंतिम फेरीतील विजेत्या कलावंतांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक पटकाविणा-या कलावंताना २१ हजार रुपये रोख, दुस-या स्थानावरील कलावंताला ११ हजार रुपये रोख व तृतीय क्रमांक प्राप्त करणा-या कलावंताला ५ हजार रुपये रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

विदर्भातील गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिका, आई कुसुम सहारे फाउंडेशन व लकी म्यूझीकल इंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’चे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी माजी आमदार मोहन मते, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आरोग्य समितीचे उपसभापती नागेश सहारे, पी.एस. चंगोले, रिचा युनिक क्लिनिकच्या डॉ. रिचा जैन, जी.एम.रोकडे, धीरज मानवटकर आदी सहकार्य करीत आहेत. डॉ. रिचा युनिक क्लिनिक, जी.एम. रोकडे ज्वेलर्स, फुड बुक्स हे स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आयोजक लकी खान (8888899321) यांच्याशी संपर्क साधावा.