Published On : Sun, Oct 3rd, 2021

उदयोन्मुख कलावंतांनाच्या कलेला मंच देणारे ‘स्वरानंद’चे कार्य स्तूत्य

ऍड. धर्मपाल मेश्राम : ‘हम हैं राही प्यार के’ संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : नागपूर शहरात अनेक प्रतिभावंत कलावंत आहेत. मात्र त्यांच्या कलेला मंच मिळत नसल्याने लोकांपुढे ती कला येऊ शकत नाही. अशाच उदयोन्मुख, प्रतिभावंत कलावंतांना मंच उपलब्ध करून देऊन त्यांची कला पुढे आणण्याचे सामाजिक भावनेतून ‘स्वरानंद’द्वारे होत असलेले कार्य हे स्तूत्य आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.

‘स्वरानंद’ अकादमी नागपूरतर्फे स्वरानंदचे अध्यक्ष अविनाश घोंगे यांचा मार्गदर्शनात हॅरिसन लाॅन्स येथे ‘हम है राही है प्यार के’ या संगीतमय हिंदी गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ऍड. धर्मपाल मेश्राम आणि हॅरिसन लाॅन्स चे सर्वेसर्वा डाॅ. हरिश राजगिरे सपत्निक उपस्थित होते.

अविनाश घोंगे यांनी गायलेल्या’प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता हैं’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर राखी काटोलकर, निलिमा खंगार, सारिका लांजेवार, आश्विनी क्षीरसागर, प्रशांत भगत, गजानन माहुलकर, मौसमी बिसेन, वैष्णवी कुंबलवार या ‘स्वरानंद’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांना रसिकांनी वन्स् मोअर चा उस्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमासाठी भाजपा महामंत्री देवेंद्र काटोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘स्वरानंद’चे सर्वेसर्वा श्री काकासाहेब तुमाने आणि विष्णुजीकी रसोईचे अर्ध्वयु प्रफुल मनोहर यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

संगीतमय कार्यक्रमात प्रशांत खडसे (सिंथेसायजर), उल्हास चिटमुलवार (ऑक्टोपॅड) आणि अनुप तायडे (तबला) ह्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार साथसंगत केली. ध्वनीप्रक्षेपण अशोक रेड्डी यांचे होते.