Published On : Sun, Oct 3rd, 2021

हृदय स्‍वस्‍थ तर शरीर स्‍वस्‍थ – डॉ. अशोक बागुल

हृदय चिकित्‍सा शिबिराचे नगरसेविका सौ प्रगती पाटील च्या पुढाकार्याने आयोजन.

नागपूर: शरीराची जीवनरेखा ही हृदयातून प्रवाही होत असते. त्‍यामुळे हृदय स्‍वस्थ राहिले तर शरीर स्‍वस्‍थ राहते. नगरसेविका सौ. प्रगती पाटील यांनी नागरिकांच्‍या हृदयाची पर्यायाने आरोग्‍याची काळजी घेण्‍याचा राबवलेला हा उपक्रम स्‍तुत्‍य आहे, अशा शब्‍दात वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक – अंबाझरी (व सायबर क्राईम एक्सपर्ट ) डॉ. अशोक बागुल यांनी मत व्‍यक्‍त केले.

नगरसेविका प्रगती अजय पाटील, रोटरी क्‍लब एलिट व वोकहार्ट हॉस्पिटल* यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने व टिळक नगर नागरिक मंडळाच्‍या सहकार्याने गांधी जयंती, लाल बहादूर शास्‍त्री जयंती व जागतिक हृदय दिनाचे * औचित्‍य साधून शुक्रवारी हृदयरोग जनजागृती व हृदय चिकित्‍सा शिबिराचे आयोजन करण्‍यात आले.

टिळक नगर सभागृहात घेण्‍यात आलेल्‍या या शिबिराचे उद्घाटन *डॉ. अशोक बागुल यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी एनआयटीचे विश्‍वस्‍त संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक प्रमोद करौती, टिळक नगर नागरिक मंडळाचे अध्‍यक्ष अण्‍णा पालकर, रमेश गिरडे, विनोद कन्हेरे, रोटरी एलिटचे अध्‍यक्ष शुभंकर पाटील, पराग नागपुरे, सुचित्रा नशिने, संगीता देशमुख, नितेश बाहे, धनराज तेलंग, * वोकहार्ट हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. दिनेश पडोळे यंची प्रमुख उपस्थिती होती. संजय बंगाले यांनी या उपक्रमाला शुभेच्‍छा दिल्‍या.

डॉ. श्रद्धा, डॉ. विनायक, सुमीत गोंडाने, प्रतिक्षा सिस्‍टर, रोशन सिस्‍टर, चंदन, गुणीराम या वोकहार्टच्‍या चमूचे शिबिराच्‍या यशस्‍वीततेकरिता सहकार्य लाभले. प्रीती गुगल, प्रकाश भेंडे, रणधीर नशिने, कैलाश कनोजिया, कल्‍पना पालकर, संतोषसिंग गुजर, संजय सावरकर, बॉबी जैन , नितीन गेडाम, शिवांगी गर्ग, धनरज तेलंग, बबलु तिवारी , सतीश रोटके, सुधीर कपुर , नितीन मते, घनःश्याम खांडवे, सोनु खान , राजेश पिल्ले, सुलभाताई जोशी , राजेश कनोजीया यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले तर आभार अण्‍णा पालकर यांनी मानले.*

ज्‍येष्‍ठ नागरिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
ट‍िळक नगर परिसरातील ज्‍येष्‍ठ नागरिकांनी पाऊस सुरू असतानादेखील शिबिराला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. वोकहार्टच्‍या तज्ञ चमूकडून ज्‍येष्‍ठ नागरिकांनी बीपी, ब्‍लड शुगर, इसीजी इत्‍यादी तपासणी करून घेतली. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्‍येने लाभ घेतला.