Published On : Fri, Nov 29th, 2019

ताजबाग,सूतगिरणी परिसरातील थकबाकीदार १६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

२५ लाख रुपयांची थकबाकी

Mahavitaran Logo Marathi

नागपूर; वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या देयकाचे पैसे नियमितपणे भरावे यासाठी महावितरणकडून वारंवार पाठपुरावा करून देखील दाद न देणाऱ्या नंदनवन उपविभागात येणाऱ्या ताजबाग, सूतगिरणी परिसरातील १६ थकबाकीदार घरगुती वीज ग्राहकांना महावितरणने दणका देत त्यांचा वीज पुरवठा खंडित केला. या थकबाकीदार वीज ग्राहकांकडून महावितरणला सुमारे २५ लाख रुपयांचे घेणे आहे. मागील अनेक महिन्यापासून थकबाकी ठेवणाऱ्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वीज पुरवठा खंडित करताच यातील एका वीज ग्राहकाने २ लाख १६ हजार रुपयांची थकबाकी असणारी रक्कम भरली. उर्वरित थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायम स्वरूपी खंडित करण्यासाठी लवकरच महावितरणकडून योग्य पावले उचलण्यात येणार आहेत. या परिसरात वीज वितरणाची जवाबदारी महावितरणने स्वीकारल्यावर दर्जेदार आणि अखण्डित वीज पुरवठ्यासाठी प्राधान्य दिले.

अनेक वीज ग्राहकांनी नियमितपणे वापरलेल्या वीज देयकाचे पैसे भरले पण अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना जाणीव करून देण्यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

दोन दिवसापूर्वी महावितरणकडून मानेवाडा, सुभेदार ले आऊट, तुळशीबाग २७ परिसरातील थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. वीज देयकाची रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात यापुढेही याच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणकडून होणारी कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी विहित कालावधीत वीज देयकाचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन जैस्वाल,प्रसन्न श्रीवास्तव, मुकेश चौधरी, मंगेश कहाळे,सह्यकक अभियंता संजय राठोड,श्रीकांत बहादुरे यांनी कारवाई केली.

Advertisement
Advertisement